
ग्रामसभेत होणार आता मतदार याद्या; अंतिम भारत निवडणूक आयोगाचा निर्णय
सोयगाव : मतदार नोंदणी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या याद्यांमधील त्रृटी दूर करून त्रुटी विरहित याद्या करण्यासाठी जिल्हाभर १६ नोव्हेंबरला थेट ग्रामसभा घेऊन नव्याने यादीत समाविष्ट झालेल्या याद्यांचे चावडी वाचन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून ग्रामसभेत यादीला मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने ता.१ नोव्हेंबर पासून नव्याने एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून ता.३० नोव्हेंबर पर्यंत या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्याचा कार्यक्रम ठेवला असून त्यानंतर ता.१३ आणि ता.१४ तसेच ता.२७ आणि ता.२८ या चार दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येऊन या मोहिमेसाठी ता.२० ला दावे व हरकती निकाली काढून पाच जानेवारीच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीसाठी जिल्हाभर ता.१६ नोव्हेंबरला मतदार याद्यांना त्रुटी विरहित करण्यासाठी ग्रामसभा घेण्यात येऊन नोंदणी झालेल्या मतदारांच्या नावांची ग्रामसभेतच पडताळणी होऊन ग्रामसभेत मतदार यादीचे चावडी वाचन करूनच या याद्यांना मान्यता घेण्यात येणार आहे.
हेही वाचा: औरंगाबाद : महापालिकेत देखील यापुढे इलेक्ट्रीक वाहने
त्यामुळे जिल्हाभरातील १६ नोव्हेंबरच्या ग्रामसभांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. ग्रामसभेत मान्यता मिळालेल्या याद्यांनाच अंतिम मतदार यादी म्हणून प्रसिद्धी देण्यात येणार आहे. त्यामुळे १६ नोव्हेंबरच्या ग्रामसभेत नव मतदारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Web Title: Gramsabha Voter List Final Indian Election Commission
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..