esakal | आजोबांकडे ठाण्याहून आलेल्या नातवाचे अपहरण, काही तासांतच पोलिसांनी काढले शोधून
sakal

बोलून बातमी शोधा

Riyansh1

घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय रियांश निळकंठ सावंत याचे शुक्रवारी (ता.११) सांगवी (ता.रेणापूर) येथून घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नानंतर तो सुखरूप शनिवारी (ता.१२) सापडला आहे. पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली चारचाकी ही जप्त केली आहे.

आजोबांकडे ठाण्याहून आलेल्या नातवाचे अपहरण, काही तासांतच पोलिसांनी काढले शोधून

sakal_logo
By
सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि.लातूर) : घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय रियांश निळकंठ सावंत याचे शुक्रवारी (ता.११) सांगवी (ता.रेणापूर) येथून घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नानंतर तो सुखरूप शनिवारी (ता.१२) सापडला आहे. पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली चारचाकी ही जप्त केली आहे. सांगवी येथील मुळचे रहिवासी पण सध्या ठाणे येथे व्यापाराचे निमित्ताने स्थायिक असलेले निळकंठ देविदास सावंत यांचा पाच वर्षीय वयाचा मुलगा गावी आजोबांकडे आला होता.

सदर मुलगा शुक्रवारी (ता.११) गावातील घरासमोर खेळत असताना काही अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहनातून रियांशचे अपहरण केले. या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी अत्यंत सावधपणे अपहरण झालेल्या रियांशची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यामुळे शनिवारी (ता.१२) सायंकाळी त्या मुलास लातूर तालुक्यातील एका गावातून शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

कोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी...

चोरट्यांनी या गुन्हासाठी वापरलेली चारचाकी वाहन बीड जिल्ह्यातून मिळविली. अपहरणकर्ते कोण होते याचा तपास पोलिस घेत आहेत. रियांशचे अपहरण होताच लातूर पोलिसांनी काही तासातच सुखरूपणे पालकाचे ताब्यात दिले. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले आरोपींच्या आम्ही शोधात असून त्यांना लवकरच ताब्यात घेऊ.

उजनीतील सरकारी गायरानावर अतिक्रमण
उजनी (जि.लातूर) येथील सरकारी गायरानावर गावातील अनेकांनी अतिक्रमण केले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. दहा) उजनी ग्रामपंचायतीकडून नोटीस जारी करण्यात आली असून, ७२ तासांत अतिक्रमण हटविण्याबाबत संबंधित व्यक्तींना सूचना केल्या आहेत. उजनी (ता. औसा) येथील राधानगर भागातील सर्व्हे नं. १६० मध्ये ग्रामपंचायत हद्दीतील आठ एकर सरकारी गायरान क्षेत्र आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्यामुळे येथील अनेकांनी त्यावर पत्र्याचे शेड, काठीचे कुंपण आदी खुणा करीत अतिक्रमण केल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्याला सर्वाधिक त्रास महावितरणच्या भोंगळ कारभाराचा; आमदार-खासदारांची...

याची तत्काळ दखल घेत येथील प्रशासक सतीश गारठे, ग्रामसेवक आर. आर. सावंत यांनी गुरुवारी अतिक्रमण केलेल्या अकरा व्यक्तींना नोटीस जारी केली आहे. नोटीस मिळताच ७२ तासांत अतिक्रमण काढून तसे ग्रामपंचायतीला लेखी कळवण्याबाबत सूचना करण्यात आल्या; अन्यथा सदर अतिक्रमण पोलिस संरक्षणाखाली काढण्यात येईल व त्यासाठी येणारा खर्च जमीन महसुलाच्या थकबाकीनुसार अतिक्रमण केलेल्या व्यक्तीकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा नोटिसीमध्ये दिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर