Umarga News : गुंजोटी येथे छत्रपती शिवरायांच्या भव्य शिवस्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न; मनोज जरांगे पाटील यांचा राज्यकर्त्यांना सज्जड दम

गुंजोटी गावाच्या बाहेर पेठेतून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची वाजत-गाजत श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
manoj jarange patil

manoj jarange patil

sakal

Updated on: 

​उमरगा, (जि. धाराशिव) - तालुक्यातील गुंजोटी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या भव्य शिवस्मारकातील शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा शनिवारी (ता. १४) रात्री आठ वाजता अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात मराठा योद्धा मनोज जरांगे  यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या तडाखेबंद भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सोहळ्यादरम्यान राज्यकर्त्यांना मराठा आरक्षणावरून थेट इशारा देण्यात आला.

Loading content, please wait...