कळंब - विदर्भतील अमरावती येथील तिवसा तालुक्यातील कोंडण्यपूर येथे विठ्ठलाची सासुरवाडी आणि रुक्मिणी यांचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कोंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानची दिंडी आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पाऊले चालती पंढरीची वाटे भजन गायन करत निघालेल्या दिंडीचे कळंब शहरात होताच धाराशिव- बीड जिल्ह्याच्या सीमेवर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, तहसीलदार हेमंत ढोकले, पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे, प्रभा पुंड, पंढरीनाथ मगर, स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे, गोविंद मोठेगांवकर, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक, एल. एस. वाघमारे, स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे यांनी स्वागत केले.