डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे

4Dhananjay_Munde_13
4Dhananjay_Munde_13
Updated on

परळी वैजनाथ (जि.बीड) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते.

महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यांतील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे. महाराजांचे ८२वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यांचा नाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराजांचा सहवास मला लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या अहमदपूरकर महाराजांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणकारी, समाजाभिमुख तसेच राष्ट्रभक्ती शिकवणारे सामाजिक काम करण्यात घालवले.

वयाच्या १०४व्या वर्षी देखील ते कार्यात व्यस्त असत. त्यांचे जीवन आदर्शवत व प्रेरणादायी होते. जलपुनर्भरण, वृक्ष लागवड व संवर्धन या क्षेत्रांतही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे हे योगदान समाज कधीही विसरणार नाही,असेही यावेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नांदेड येथील संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृती बाबत विचारणा केली होती आणि त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले, महाराजांच्या जाण्याने समाजाची अतोनात हानी झाली असून, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री मुंडे म्हणाले.

(संपादन - गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com