मोठा दिलासा... हिंगोलीत एकाच दिवशी दहाजणांचा कोरोनावर विजय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्ष व अधीनस्थ असलेल्या कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांनी एकाच दिवशी सोमवारी कोरोनावर विजय मिळविला, तर दुसरीकडे वसमत येथील अशोकनगर येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो औरंगाबाद येथील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. 
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार, एकाच दिवशी दहा कोरोना योद्ध्यांनी कोरोनावर मात केली. या दहाजणांसमवेत लिंबाळा येथील चार - यात प्रगतीनगर एक, पिंपळखुटा एक, भांडेगाव दोन, तर वसमत सेंटर येथील चार रुग्ण बरे झाले आहेत. शिवाय टाकळगव्हाण दोन, रिधोरा एक, दर्गापेठ एक, तसेच कळमनुरी येथील विकासनगरातील दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. 

औरंगाबादेतून आला अन् बाधित निघाला 
वसमत क्वारंटाइन सेंटरअंतर्गत एका ३३ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. सदरील रुग्ण हा अशोकनगर येथील रहिवासी आहे. तो औरंगाबाद येथून गावी परतला आहे. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३३३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २८७ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आजघडीला एकूण ४६ रुग्णांवर उपचार चालू आहेत. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात १६ कोरोना रुग्ण असून यात १ रिसाला बाजार, १ मकोडी, २ बहिर्जीनगर, १ गांधी चौक, १ जी.एम.सी. नांदेड, १ पेडगाव, २ शुक्रवारपेठ, १ नवलगव्हाण, ३ तलाबकट्टा, २ दौडगाव, १ गवळीपुरा येथील आहेत. 

इतर ठिकाणचे रुग्ण 
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये १६ कोरोना रुग्ण असून १ दर्गापेठ, १ रिधोरा, २ टाकळगाव, १ जयनगर, १ वापटी, ७ शुक्रवारपेठ, १ स्टेशन रोड, १ सोमवार पेठ, १ सम्राटनगर येथील रहिवासी आहेत. कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकूण ९ कोरोना रुग्ण असून त्यात २ विकासनगर, ४ नवी चिखली, १ डिग्रस, १ शेवाळा, १ नांदापूर येथील रहिवासी आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. कोरोना केअर सेंटर लिंबाळाअंतर्गत सात कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यात तलाबकट्टा एक, भांडेगाव एक, हनवतखेडा एक, कळमकोंडाचे चार रुग्ण आहेत. तसेच कळमनुरी कोरोना केअर सेंटर येथे एकूण सात रुग्णांवर उपचार सुरू असून यात नवी चिखली चार, डिग्रस एक, शेवाळा एक, नांदापूर एक यांचा समावेश आहे. सेनगाव सेंटरवर ३ कोरोनाचे रुग्ण असून यात १ केंद्रा बुद्रुक, २ वैतागवाडीचे आहेत. 

(संपादन ः प्रवीण मुके)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com