Vande Bharat Railway : जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू; DCM फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरूsakal

Jalna News : मनमाड ते जालना रेल्वे विद्युतीकरण पूर्ण झाले पूर्ण झाले. त्यामुळे जालना रेल्वे स्थानकावरून शनिवारी (ता. 30)§जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी हिरवा झेंडा दाखवली.

संपूर्ण देशात आज घडीला 34 वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. यामध्ये शनिवारी (ता. 30) आठ वंदे भारत रेल्वेची भर पडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला आहे.

या आठ वंदे भारत रेल्वेमध्ये जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे ही जालना रेल्वे स्थानक येथून सुरू करण्यात आली आहे. जालना रेल्वे स्थानक येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,

पालकमंत्री अतुल सावे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

जालना रेल्वे स्थानकावरून सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई येथे जाण्यासाठी फायदा होणार आहे. यात प्रामुख्याने जालना, छत्रपती संभाजीनगर या दोन शहरातील प्रवाशांसाठी ही रेल्वे महत्त्वाची ठरणार आहे.

याशिवाय परभणी, नांदेड या शहरातील प्रवाशांनाही जालना येथून या रेल्वेने प्रवास करता येणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती संभाजी नगर मनमाड नाशिक रोड कल्याण ठाणे दादर या रेल्वे स्थानकावर थांबे घेऊन मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल रेल्वे स्थानका पर्यंत जाणार आहे ही रेल्वे नियमित धावणार असून जालना येथून पहाटे 5.05 मिनिटांनी सुटणार अजून ती मुंबई येथे बारा वाजेपर्यंत पोहोचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com