esakal | कोरोना प्रादूर्भाव रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट काम, पालकमंत्र्यांनी केले कौतूक 
sakal

बोलून बातमी शोधा

download

कोरोना प्रादूर्भाव रोखण्याकरिता केलेल्या उपाययोजना, महावितरणमार्फत वितरित केलेल्या सौर कृषी पंप, सामाजिक न्याय विभागांतर्गत घरकुल योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विषयांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री प्रा.गायकवाड बोलत होत्या. 

कोरोना प्रादूर्भाव रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाचे उत्कृष्ट काम, पालकमंत्र्यांनी केले कौतूक 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : नागरिकांना भौतिक सुविधा व शेतक-यांना पूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपायोजनांबाबत पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आढावा बैठक घेतली. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन उत्कृष्ट काम केले आहे. कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला असून जिल्ह्यात जिल्ह्यात उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही, ही बाब कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.  

या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. 

डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीने नियूक्ती करावी
पालकमंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन करुन उत्कृष्ट काम केले आहे. कोरोना उपाययोजना संदर्भात जिल्ह्याने पॅटर्न निर्माण केला असून जिल्ह्यात जिल्ह्यात उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही. तसेच कोरेानामुळे जिल्ह्यातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे पंरतू ते जिल्ह्याबाहेर उपचार घेत होते. संचालक आरोग्य सेवा, पूणे यांच्या अहवालानुसार हिंगोली जिल्हा कोरोना विषाणूजन्य आजाराचे बाधित रुग्ण बरे होण्यामध्ये (रिकव्हरी रेट) महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकावर आला असून ही जिल्ह्याकरीता अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय पद रिक्त असल्याने स्थानिक डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीने नियूक्ती करावी, असेही त्यांनी निर्देश दिले. 

हेही वाचा - संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर

नादूरुस्त पुलांची दूरुस्ती करा 
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत ज्या लार्भार्थ्यांचे अर्ज रद्द ठरविण्यात आले त्यांचे अर्ज पुन्हा नव्याने परिपूर्ण भरुन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सामाजिक न्‍याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना करिता केंद्र व राज्य शासनामार्फत येणाऱ्या निधीचा आढावा घेत जो निधी अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही, त्याची माहिती सादर करण्यास सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी जिल्ह्यात नादूरुस्त असलेले पुलांची पाहणी करून त्यांची तत्काळ दूरुस्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी या वेळी दिल्या. 


हेही वाचा - कोरोना इफेक्ट : शाळा सुरु करण्याबाबत शाळांची नकार घंटा

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जागतिक लोकसंख्या दिन 
हिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात शनिवारी (ता.११) पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी प्रसिद्धी शाखेमार्फेत लावलेल्या प्रदर्शन व बॅनर यांची पाहणी केली. तसेच पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात कोरोनाबाबत गावोगावी कोरोना एक्सप्रेसद्वारे व इतर माध्यमाद्वारे केलेल्या प्रचार व प्रसिद्धीबाबत झालेल्या कामाची प्रशंसा केली. जागतिक लोकसंख्या दिनाबाबत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. देवेद्र जायभाये यांनी दिली. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, बापु सुर्यवंशी, मुन्नाफ आदींची उपस्थिती होती. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

loading image