narhari zirwal
sakal
हिंगोली - जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी तब्बल चार वर्षानंतर मुहूर्त लागला असतानाच पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या वितरणात खोडा घातला असून १७ सप्टेंबर रोजी होणारा पुरस्कार वितरण सोहळा रद्द झाला आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून फोन येताच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.