बीड जिल्ह्यात पिठाच्या पोत्यांत गुटखा, ४५ लाखांचा ऐवज जप्त

truck
truck

गेवराई (जि. बीड) - अत्यावश्यक वस्तू पुरविण्याचा पास घेत पिठाच्या पोत्यांमधून गुटखा तस्करीचा अफलातून प्रकार चेकपोस्टवर उघड झाला आहे. महंतटाकळी येथे पोलिसांनी २३ लाखांचा गुटखा आणि १२ लाखांचा टेंपो असा ४५ लाखांचा ऐवज पकडला. 

बीडमधून शनिवारी परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. यावेळी आयशर टेम्पोत (एके ०१ - ५८५१) पिठाचे पोते परजिल्ह्यांत घेऊन जात असल्याचे चालकाने पोलिसांना सांगितले. मात्र, तरीही पोलिसांना शंका आली म्हणून उघडून पाहिले तर आतमध्ये पिठाचे पोते कमी आणि गुटख्याचेच पोते अधिक आढळून आले. हा टेंपो हैदराबाद येथून नाशिककडे जात असल्याचे चौकशीत समोर आले.

फौजदार योगेश कोरडे यांनी ही कारवाई करत टेंपो पकडून चकलांबा पोलिसांच्या हवाली केला. पोलिस हवालदार कांबळे, कांदे, पोलिस नायक सय्यद चॉंद यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, अन्न व औषधी प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी ए. बी. भिसे, एच. आर. मरेवार यांनी चकलांबा येथे जाऊन पकडण्यात आलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com