चाकूरजवळ अडीच लाखाचा गुटखा जप्त

tempo
tempo

चाकूर : सोलापूर येथून विदर्भात गुटखा घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच.१३ सी.यू. ०८६९) ला लातूर नांदेड रस्त्यावर चापोली (ता.चाकूर) जवळ उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे यांनी शुक्रवारी (ता.१०) रात्री पकडून चाकूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या टेम्पोत तीस पोते गुटका आढळून आला. याची अंदाजे किंमत दोन लाख बावन्न हजार रुपये आहे तर टेम्पो ची किंमत सात लाख रुपये असा एकूण साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे.

टेम्पो चालक अशोक अभिमन्यू मोरे व मदतनीस अविनाश भगवान वाघमारे यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यावर अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com