

gutkha seized
sakal
उदगीर, (जि. लातुर) - महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला उदगीर ग्रामीण पोलिसांनी पकडले. बिदर गेट परिसरातील ठाकरे चौक येथे शुक्रवारी (ता. १६) रात्री करण्यात आलेल्या कारवाईत २ लाख ४८ हजार ५३८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १२ लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची गाडी, असा एकूण १४ लाख ४८ हजार ५३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.