

Gyan Prabodhini Harali received the Vasantrao Naik Shetimitra Award for excellence in agriculture, education, water conservation, and rural development.
Sakal
जेवळी : मुंबई येथे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त (कृषी दिन) पार पडलेल्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळ्यात, मराठवाड्यात शिक्षण, शेती आणि जलसंधारणाचे मोठे काम करणाऱ्या 'ज्ञान प्रबोधिनी, सोलापूर संचलित केंद्र हराळी (ता. लोहारा) या संस्थेला 'वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२३' राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.