

Chha.Sambhajinagar News
sakal
हर्सूल,: शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा हर्सूल पोलिसांनी छडा लावत दोन आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत ७ लाख २० हजार रुपये आहे.
हर्सूल पोलिस ठाण्यात २९ ऑगस्टला विक्की शेषराव चौथमल (वय २८, रा. जाधववाडी, हर्सूल) यांनी त्यांची दुचाकी घरासमोरून चोरीस गेल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला.