esakal | ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली 
sakal

बोलून बातमी शोधा

लिंबी(ता.घनसावंगी) येथील सतिष तौर यांनी शेतात उभे केलेले हार्वेस्टर.

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभुमीवर शहरासह अगदी खेड्यापाड्यापर्यंत विविध उद्योगधंदे बंद आहेत.सध्या गहु,हरभरा,करडी काढणीचे दिवस असतानाही हार्वेस्टरची चाके मात्र थांबली आहेत. हार्वेस्टरवर काम करणारे परराज्यातील अनेक मजुर असल्याने त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली असुन त्यांना बाहेर पडु दिल्या जात नाही.

ग्रामीण भागातील हार्वेस्टरचीही चाके थांबली 

sakal_logo
By
लक्ष्मीकांत कुलकर्णी

कुंभार पिंपळगाव (जि.जालना) -  कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभुमीवर शहरासह अगदी खेड्यापाड्यापर्यंत विविध उद्योगधंदे बंद आहेत.सध्या गहु,हरभरा,करडी काढणीचे दिवस असतानाही हार्वेस्टरची चाके मात्र थांबली आहेत.

शेतात गहु,हरभऱ्याचे पिक उभे आहे. मजुराअभावी पिक काढता येत नाही. दुसरीकडे कधीकधी ढग भरून येतात. यामुळे अवकाळी पाऊस येवुन पिकाचे नुकसान होण्याची भिती आहे, मात्र हार्वेस्टर बंद ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे हार्वेस्टरवर काम करणारे परराज्यातील अनेक मजुर असल्याने यांनी स्वतंत्र व्यवस्था केली असुन त्यांना बाहेर पडु दिल्या जात नाही.

हेही वाचा :  परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस 

मशिन सुरू केल्यास मजूर, शेतकरी गर्दी करतात व त्यापासुन साथ पसरण्याची भिती असते. त्यामुळे परिसरातील हार्वेस्टर बंद ठेवण्यात आले आहेत. 


हार्वेस्टर १६ यंत्रे बंद 
लिंबी येथील माऊली हार्वेस्टरचे संचालक सतीश तौर यांनी सध्याची स्थिती लक्षात घेता तब्बल १६ हार्वेस्टरची यंत्रे बंद ठेवली आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात गहु, हरभरा,करडईचे क्षेत्र आहे. मागणी असतानाही केवळ कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यांनी ही पावले उचलली आहेत. देश वाचवायचा असेल,आपला परिवार, पाहुणे, कुटुंब सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्याला थांबावे लागेल, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली. 

कर्ज काढुन हा माऊली हार्वेस्टर हा व्यवसाय उभा केला आहे. देशासह विविध राज्यातुन प्रशिक्षित चालक आणुन हा उद्योग सुरू केला. त्यांचा जीव माझ्यासाठी किमती आहे. कोरोनाबाबत सर्वांनी जागरूक राहावे. हे जागतिक संकट आहे. सध्या थांबणे हाच योग्य पर्याय आहे. मी १६ हार्वेस्टर यंत्रे बंद ठेवली आहेत. नुकसान झाले तरी काही हरकत नाही. 
- सतीश तौर 
संचालक, माऊली हार्वेस्टर 

loading image
go to top