

Grocery Shop Theft in Hast Pokhari
अंबड: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथे अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानाचे शटर व पट्ट्या तोडून दुकानातील विविध प्रकारचा किराणा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत सुमारे ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी सिद्धेश्वर रमेश धुगे यांचे अंबड तालुक्यातील हस्तपोखरी किराणा दुकान आहे.