...अन् त्याने केला मैत्रीचा विश्वासघात !

file photo
file photo

जिंतूर (जि.परभणी) : जिंतूर शहरातील संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाचा त्याच्याच मित्राने धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (ता. तीन) शहरातील वरुड रोड भागात दुपारी घडली. दरम्यान, जखमी तरुणाला उपचारासाठी परभणीकडे नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.
 दरम्यान, संशयित आरोपी संतोष जाधव यास मंठा (जि. जालना) येथून अटक करण्यात आली आहे.

योगेश मल्हारी राऊत (वय २१, रा. संभाजीनगर, जिंतूर) असे मृत युवकाचे नाव आहे. सदर युवकाच्या मित्राने त्याला दुपारच्या सुमारास दुचाकीवर बसवून वरुड रोडवरील गुरुकुल आश्रमाजवळ नेले. या ठिकाणी हत्याराने पोटात भोसकून योगेश राऊतला जखमी केले. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी योगेशच्या नातेवाइकांना सांगितली. जखमी योगेशला तातडीने उपचारासाठी जिंतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

आरोपीला अटक
प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात नेत असताना योगेशचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी संतोष जाधव यास मंठा येथून अटक केली.

हेही वाचा...


अश्लील मेसेज पाठविणाऱ्यावर गुन्हा
सोनपेठ (जि.परभणी) : सोनपेठ शहरात नोकरीसाठी वास्तव्यास असणाऱ्या एका विवाहित महिलेस अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठविणाऱ्या एका अज्ञात व्यक्ती विरुद्ध सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील महिला ही शहरात एका संस्थेत नोकरी करते. या महिलेच्या फोनवर काही दिवसांपासून एका अनोळखी व्यक्ती त्यांच्या मोबाइलवरून फोन, मेसेजेस तसेच व्हिडिओ पाठवत होता. रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करून सदरील महिलेस त्रास देत होता. या महिलेने मंगळवारी (ता. तीन) सोनपेठ पोलिसात सदरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा ....

 चुडावा येथे दोन ठिकाणी घरफोडी

पूर्णा (जि.परभणी) : घराच्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करूत चोरट्यांनी दोन घरात केलेल्या चोरीत ९१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना चुडावा (ता. पूर्णा) येथे मंगळवारी (ता. तीन) पहाटे घडली. चुडावा पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चुडावा गावाजवळ कावलगाव फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत घर असलेल्या गोपाळ बापूराव देसाई हे हरभरा काढण्यासाठी शेतात गेले असताना मंगळवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ६५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, तर त्यांच्या घराशेजारी राहणारे शहाजी मारुती देसाई यांच्या घरातून रोख २५ हजार रुपये, असे ९९ हजार पाचशे रुपये लंपास केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com