Headmaster nanasaheb Danave
sakal
कायगाव - सततच्या पावसामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंब (ता. गंगापूर)च्या परिसरात गवत आणि झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे लक्षात घेऊन शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब दानवे यांनी शुक्रवारी (ता. 11) रोजी स्वतः पाठीवर तणनाशकाचा पंप घेऊन शालेय परिसरात 6 पंप फवारणी केली. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.