esakal | ऑनलाईन शिक्षणात हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने वाढला धोका
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाईन शिक्षणात हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने वाढला धोका

ऑनलाईन शिक्षणात हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने वाढला धोका

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु आहेत. मोबाईल हेडफोन, इयरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षण वैद्यकीय वर्तुळातून नोंदविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांतच मुलांमध्ये कानांचे आजार वाढले आहे. सतत लावून ठेवलेले हेडफोन, इयरफोन व ब्लूटूथमुळे कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्‍य, चिडचिड यामुळे मानसिक आजारही बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शहरातील कान-नाक आणि घसा तज्ज्ञांशी "सकाळ'ने संवाद साधल्यावर कानांच्या दुखण्याचे आणखी एक कारण समोर आले. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी मुलांकडून ब्लूटूथ, हेडफोनचा अतिप्रमाणात वापर वाढला आहे. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणाच्या ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर पडत असल्याने अंतर्कर्णातील पेशींवर ताण पडत आहे.

ब्लूटूथ, इयरफोन आणि हेडफोनमुळे आवाज थेट कानांच्या पडद्यावर जाऊन आदळत आहे. यातून ऐकू न येण्याबरोबरच कानांचे अन्य आजार वाढू लागले आहेत. मोबाईलचे हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने विद्यार्थ्यांमध्ये कानांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षणासाठी ॲण्ड्रॉईड फोनचा अतिवापर विद्यार्थ्यांकडून होत आहे. सततच्या वापराने श्रवणपेशी खराब होऊन कायमस्वरूपी कर्णबधिरत्वाची समस्या वाढू लागली आहे. गेल्या दिड वर्षांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये ऐकू न येण्याच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: Online Education : विषय शिकविलाच नाही, म्हणे द्या आता परिक्षा !  

तर तपासणी करा

कानांच्या पडद्याला जखम किंवा छिद्र पडले असेल तर कानात कुरतडल्यासारखा आवाज येतो. त्यामुळे कान ठणकणे, कान जड पडणे, मागची बाजू दुखणे, आवाज येणे, मोठ्या आवाजामुळे कानांवर ताण येत असेल तर ताबडतोब डॉक्‍टरांकडून तपासणी करून घ्या.

अतिवापरामुळे होणारे आजार

  1. ऐकायला कमी येणे

  2. स्पष्टपणे ऐकू न येणे

  3. रक्तदाब, मानसिक आजार

  4. घ्यावयाची काळजी

  5. ऑनलाईन शिक्षणासाठी हेडफोन, ब्लूटूथचा वापर टाळा

  6. कानात काडी, पेन अशा वस्तू घालणे टाळा

  7. हेडफोन, ब्लूटूथचा अतिवापर टाळा

loading image
go to top