esakal | कोरोना तपासण्यांची संख्या वाढवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश

बोलून बातमी शोधा

Health Minister Rajesh Tope

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात दाखल होत आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे.

कोरोना तपासण्यांची संख्या वाढवा, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आदेश
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अँटीजेन तपासण्याच्या तुलनेत आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्याबरोबरच संस्थात्मक अलगीकरणावर अधिक भर देण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिले आहेत. (Health Minister Rajesh Tope has ordered to increase the number of corona tests)

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी (ता.तीन) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या श्री. यावेऴी टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्यचित्किसक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, डॉ. संतोष कडले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात दाखल होत आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करत असून घरीच राहत आहेत. त्यामुळे रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरणावर भर देण्यात यावा. खाजगी दवाखान्यात कोविड बाधितांवर उपचारापोटी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सुधारणा करण्यात येणार आहे. जे खाजगी दवाखाने शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारातील अशा रूग्णालयांवर कारवाई करा.

तसेच खाजगी रुग्णालयात आवश्यकता नसतानाही रूग्णांना वेगवेगळ्या तपासण्या करण्यास सांगण्यात येतात. त्यामुळे रुग्णांवर अधिकचा आर्थिक भार पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सूचना करण्याचे निर्देश देत ग्रामीण भागामध्ये खासगी डॉक्टरांनी कोविडची लक्षणे असलेल्यांचीच चाचणी करावी व शासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणेच रुग्णांवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना यावेळी श्री. टोपे यांनी दिल्या.

तसेच ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधाची पोलिस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.