जेवळी (ता. लोहारा) - येथे लिंगायत स्मशानभूमीच्या संदर्भात बुधवारी (ता.१३) बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत झालेल्या जोरदार वादावादी व गोंधळा नंतर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून स्मशानभूमीसाठी बेमुदत उपोषण करीत असलेले उपोषणकर्त्यासह त्यांचा मुलगा, भाऊ, भाचासह सहा जणांवर शासकीय कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर गावात काही प्रमाणात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी गस्त वाढवले आहे.