- धनंजय शेटे
भूम - तालुक्यात मुसळधार पावसाने ग्रामीण भागाचा संपर्क तुटला, नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भूम शहर आणि तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने शनिवारी २६ जुलै रोजी मुसळधार रूप धारण केले असून ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.