म्हैसमाळ येथे जोरदार पावसामुळे येळगंगा नदीला पूर

देवदत्त काेठारे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

खुलताबाद (जि.औरंगाबाद) ः वेरूळ (ता. खुलताबाद) येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या येळगंगेला रविवारी (ता. एक) दुपारी झालेल्या दमदार पावसामुळे पूर आला. या नदीवर औरंगाबाद-धुळे महामार्ग असून त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून पाणी वाहिल्याने जवळपास एक ते दीड तास रहदारी ठप्प झाली होती.

तालुक्‍यातील वेरूळ येथील येळगंगा नदीला लेणीतून वाहणारा सीताची न्हाणी या धबधब्यातून पाणी येते. सदरील धबधब्याचा उगम म्हैसमाळ असून या परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने सीताची न्हाणी धबधबा रौद्र स्वरूप धारण करून चांगलाच खळाळल्यामुळे येळगंगा नदीला अचानक पूर आला. त्यामुळे औरंगाबादकडून धुळ्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना दीड तास थांबावे लागले. वाहनांच्या दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पुलावरील पाणी ओसरल्यावरच रहदारी सुरळीत झाली. तालुक्‍यातील गल्लेबोरगाव, टाकळी राजेराय परिसरात पावसाने दीड ते दोन तास धूवाधार पाऊस पडल्याने गल्लेबोरगाव आठवडे बाजारात पाणी, तर टाकळी राजेराय येथून वाहणाऱ्या गिरिजा नदीला पूर आला.

पूर गेला वाहून

वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाला जोडणारा येळगंगा नदीवरील पूर पाण्याच्या दाबामुळे वाहून गेला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain Flooded Yelganga River