esakal | हिंगोलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; कयाधू, पैनगंगा दुथडी वाहतायत | Hingoli Rain Updates
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली - पावसामुळे पैनगंगा दुथडी भरुन वाहतेय.

हिंगोलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; कयाधू, पैनगंगा दुथडी वाहतायत

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) शुक्रवारी (ता.एक) मध्यरात्री मेघगर्जना व विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. शनिवारी (ता.दोन) सकाळी आठ वाजेपर्यंत १३.१० मिलिमीटर पाऊस झाला असुन आजपर्यंत १२७. २७ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मागील चोवीस तासात १३.१० मिलिमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय झालेला पाऊस (Rain) हिंगोली तालुका ५.८० मिलीमीटर, कळमनुरी ८.७०, वसमत ९.८०, औंढा ४ ७० सेनगाव ३५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकुण १३.१०, तर आजपर्यंत १२७.२७ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातुन वाहणाऱ्या कयाधु (Kayadhu River) व पैनगंगा (Painganga River) या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. जिल्ह्यात शुक्रवारी रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास हा पाऊस झाला. दीड ते दोन तास विजांच्या कडकडाटा व वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

हेही वाचा: औरंगाबाद-मुंबई एअर इंडिया विमान परतले, शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

जिल्ह्यातील मागच्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकांच्या शेंगामधून नवीन अंकुर फुटले. पावसाने एक दिवस विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील साचलेले पाणी काढून, शेतातील वाचलेले पिक कापण्याची तयारी सुरू केली होती. मात्र परत झालेल्या जोरदार पावसामुळे राहिलेल्या पिकाचेही नुकसान झाले. दरम्यान आज सकाळपासून कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण दुपारपर्यंत होते.

loading image
go to top