जळकोमध्ये अवकाळी पावसात वीज पडून बैल ठार; फळबागांचे मोठे नुकसान

सायंकाळी तीन वाजता अचानक आकाशात काळे ढग जमले होते. अडीच वाजल्यापासून पासून वादळी वारा, विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु होता
heavy rain
heavy rainheavy rain

जळकोट (लातूर): शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह (heavy rain in jalkot) आज (ता. ७) तीन वाजता पावसाला सुरवात झाली. यात अतनुर (ता.जळकोट) येथे वीज पडून बैल ठार झाला तर पाटोदा खुर्द येथील घराचे आतोनात नुकसान झाले (damage due to heavy rain) असून आंब्याच्या बागांची मोठ्या प्रमाणात कैरीची गळती होऊन नुकसान झाले.

सायंकाळी तीन वाजता अचानक आकाशात काळे ढग जमले होते. अडीच वाजल्यापासून पासून वादळी वारा, विजेचा कडकडाटसह जोरदार पाऊस सुरु होता. पाटोदासह अनेक भागात वादळी वाऱ्यामुळे झाडे आडवी पडली आहेत. तर अनेक घरासह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अतनुर येथील कोंडीबा जाधव यांचा बैलाचा वीज मृत्यू होऊन मृत्यू झाला. तसेच धनगरवाडील रामदास दत्ता कोरे या शेतकऱ्याची म्हैस वीज पडून दगावली आहे.

heavy rain
भालकी हिरेमठ संस्थान करणार कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचा संभाळ

यावर्षी आंब्याला कैऱ्या मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत. आंबा खाण्यासाठी येत असताना अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे आंब्याच्या कैऱ्यांची गळती होऊन बागायतदार व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कोरोनाचे संकट शेतकऱ्यांच्या भोवती फिरत असताना आता वादळी वारा व अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे. दुपारी तीन पासून आकाशात विजेचा कडकडाट चालू होता. आठवड्यातून दोन दिवस अवकाळी पाऊस वारा झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

limb
limblimb

दरम्यान अवकाळी पाऊस व वादळी वारा यामुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बागायदार व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

अवकाळी पाऊसामुळे चाळीस टक्के आंब्याची गळती झाली असून पडलेला आंब्याला कोणताही ग्राहक हात लावत नाही. त्यामुळे पाडाला आलेला घास अवकाळी पाऊसाने हिरावून घेतला असून पंचनामा करून शासनाने मदत करावी- बालाजी केंद्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com