esakal | शहागड-पैठण मार्गावरील चांदसुरा नाला तुडूंब; रात्रीपासून वाहतूक बंद
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain in Jalna

शहागड-पैठण मार्गावरील चांदसुरा नाला तुडूंब; रात्रीपासून वाहतूक बंद

sakal_logo
By
दिलीप पवार

अंकुशनगर (जालना): गेल्या दोन दिवसापासून वडीगोद्री शहागड परीसरात पावसाने थैमान घातले आहे. दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस झाल्याने अंबड तालुक्यातील शहागड जवळील चांदसुरा नाल्याला पूर आला आहे. यामुळे शहागड-पैठण मार्गावरील वाहतूक ५ सप्टेंबरच्या रात्रीपासून बंद झाली आहे. ६ सप्टेंबरच्या सकाळी ११ पर्यंत चांदसुरा नाल्यावरील पाणी ओसरले नव्हते.

शहागड-पैठण मार्गावरील वाहतूक बंद

शहागड-पैठण मार्गावरील वाहतूक बंद

या चांदसुरा नाल्याला पाणी आल्याने सहा गावाचा संपर्क तुटला आहे. साष्टपिंपळगाव, गोरी, गंधारी, बळेगाव, आपेगावकडे जाणाऱ्यांना पाण्यातून जीवघेणी वाट काढत अनेक जण जात होते. पाणी असल्याने पैठणकडून येणारी सर्व वाहने रात्रभर एकाच ठिकाणी होते. शहागड - पैठण मार्गावरील पुलावर कालपासून पाणी वाहत असल्याने हा मार्ग रात्रीपासून बंद झालाय. मात्र काही नागरिक रस्ता ओलांडताना जीवघेणी कसरत करताना पाहायला मिळत आहेत.

loading image
go to top