esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

मदनसुरी (ता.निलंगा) : ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे.

निलंगा तालुक्यात मुसळधार पाऊस, दोन शेतकरी गेले वाहून

sakal_logo
By
सिद्धनाथ माने

मदनसुरी (जि.लातूर) : मदनसुरीसह (ता.निलंगा) (Nilanga) परिसरात दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे ओढे, नदी-नाले भरून वाहत आहेत. या पावसामुळे मदनसुरी ओढ्याला मोठा पूर (Rain) आला आहे. हा ओढा ओलांडत असताना दोन शेतकरी वाहून गेले. मात्र सुदैवाने त्यांचा जीव वाचला. मदनसुरी, रामतीर्थ, अंबुलगा (वि), हाडोळी, रामलिंग मुदगड, हत्तरगा (हा) यासह परिसरात रविवारी (ता.दहा) दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले-ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मदनसुरी येथील (Latur) ओढ्याचेही पाणी पुलावरून वाहत असून सकाळी शेताकडे गेलेले शेतकरी संजय माने व शैलेश माने हे दोन शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले होते.

हेही वाचा: कर्ज काढू; पण शेतकऱ्यांना मदत करू : अजित पवार

त्यांना पोहता येत असल्याने ते थोड्या अंतरावर बाहेर निघाले आणि त्याचा जीव सुदैवाने वाचला. मदनसुरी ओढ्यावरील पूल अनेक वर्षांपासून नादुरुस्त असून अनेक दिवसांपासून नवीन पुल मंजूर करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असूनही अद्याप या पूलाच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे मदनसुरी येथील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावे लागत आहे. शासनाचे दुर्लक्ष आज शेतकऱ्यांना जीवावर बेतला होता. सुदैवाने त्यांचा कुठलाही धोका झाला नाही. या ओढ्याच्या पुलाचे लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

loading image
go to top