Heavy Rain in sillod
sakal
सिल्लोड - तालुक्यातील आमठाणा मंडळात तीन तासात झालेल्या ढगफुटीमुळे 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर मध्यरात्री मोठा होता यामुळे या परिसरातील नदी, नाले दुथडीसह पात्र सोडून वाहिल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या.