Monsoon Update : धाराशिव जिल्ह्यात दमदार पाऊस, उमरग्याला झोडपले; नदी, नाले, ओढे झाले वाहते; महावितरण कार्यालयात शिरले पाणी
Pre Monsoon Rains : धाराशिव जिल्ह्यात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. उमरग्यासह पाच महसूल मंडळांत दोन तास मुसळधार पाऊस कोसळला; नदी-नाले वाहू लागले, तर महावितरण कार्यालयात पाणी शिरले.
उमरगा : शहरासह तालुक्याला सोमवारी (ता. २६) दुपारी तब्बल दोन तास मुसळधार पावसाने झोडपले. दरम्यान, धाराशिव शहरासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पंधरा दिवसांपासून अधूममधून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते.