Latur Rainsakal
मराठवाडा
Latur Rain : लातूर शहरात पावसाचे ‘कमबॅक’; अर्ध्याच तासाच्या पावसाने रस्त्यांवर साचले पाणी
Monsoon 2025: लातूर शहरात तीन दिवसांनंतर जोरदार पाऊस आला, ज्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले. वादळी वाऱ्यासह सुमारे ४५ मिनिटे मुसळधार पाऊस झाला.
लातूर : मॉन्सुनचा प्रवाह कमजोर झाल्याने पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने लातूरात रविवारी (ता. १) कमबॅक केले. सायंकाळच्या सुमारास ४५ मिनिटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.