बीड जिल्ह्यात पाच मंडळांत अतिवृष्टी

जालिंदर धांडे
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

सोमवारी रात्री जोरदार पाऊस येऊन बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मान्सूनच्या साडे तीन महिन्याच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यात असा पाऊस पाहायला मिळाला.

बीड : सोमवारी रात्री जोरदार पाऊस येऊन बीड जिल्ह्यातील पाच महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मान्सूनच्या साडे तीन महिन्याच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यात असा पाऊस पाहायला मिळाला. बीड शहरातून जाणारी बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहिली.  शहरातील  दगडी पुलावरून पाणी वाहिले, तीन वर्षापासून न वाहिलेली नदी वाहू लागल्याने, पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मध्यरात्री पुलावर गर्दी केली होती.

तीन वर्षापुर्वी 23 सप्टेंबरला याच दिवशी जिल्ह्यामध्ये धुवाधार पाऊस झाला होता. यावेळी जिल्ह्यातील नदी-नाले पूर्ण वाहिले होते, तलावही भरले होते. तीन वर्षानंतर सोमवारी परत बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी असा पाऊस पाहायला मिळाला. यामध्ये बीड तालुक्यातील बीड मध्ये १४० मिमी. राजुरी ११५ मिमी. पाली ११० मिमी,  आष्टी तालुक्यातील दौ. वडगाव ६७ मिमी, वडवणी तालुक्यातील कवडगाव ९५ मिमी, या पाच ठिकाणी अतिवृष्ठीची नोंद झाली. प्रथमच झालेल्या दमदार पावसामुळे शेतकर्‍यांच्या चेहरावर पुन्हा हसू फुलले आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

शहरात पाणीच पाणी चोहीकडे
बीडमध्ये नाल्या तुंबल्याने रस्त्यांवरून पाणी वाहिले. अनेक भागांत कामरेईतके पाण्याचे डोह साचलेले होते. दुकाने आणि घरांत देखील पाणी शिरले. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सर्वत्र पाणी होते. टेबल खुर्च्या पाण्याखाली होत्या.

जिल्ह्यात असा झाला पाऊस
वडवणी — ७३.०५ मिमी.
बीड — ५०.०१, मिमी.
आष्टी — २३.०६ मिमी.
शिरुर — २१.०३ मिमी.
माजलगाव — १५.०७ मिमी.
परळी — ११.०४ मिमी.
पाटोदा — ६.०५ मिमी.
गेवराई — १.०९ मिमी
धारीर — १.०० मिमी
केज — ९.७ मिमी
अंबाजोगाई — 0.00

अतिवृष्टी झालेले ठिकाण
बीड — १४॰ मिमी
राजुरी — ११५ मिमी
पाली — ११॰ मिमी
दौ.वडगाव — ६७ मिमी
कौडगाव बु. — ९५.॰॰ मिमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in marathwada beed yesterday