वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस, टाकळी -अब्दुलपूर प्रकल्प भरला

आरेफ पटेल
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

टाकळी राजेराय (जि.औरंगाबाद) ः रविवारी (ता. सहा) टाकळी राजेराय (ता. खुलताबाद) येथे दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकरी सुखावले असून बाजरीची काढणी करणाऱ्यांची मात्र तारांबळ उडाली.
यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे यंदाही दुष्काळाची चिन्हे गडद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती; परंतु परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसात टाकळी-दासावाडी रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर पडली. यातील काही झाडे शेतकऱ्यांनी स्वतः छाटणी करून बाजूला करीत रस्ता मोकळा केला. पोळ्यानंतर परिसरात काही प्रमाणात चांगला पाऊस झाला. दक्षिण बाजूने वाहणारी गिरिजा नदी आणि उत्तरेकडून वाहणारी सुरजा नदीही आता वाहती झाल्यामुळे नदीशेजारील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या अल्प पावसामुळे कोरडा पडलेला टाकळी अब्दुलपूर लघुसिंचन प्रकल्प धरण यंदा शंभर टक्के भरला आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या दुष्काळामुळे या भागात शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. या धरणापासून टाकळी व अब्दुलपूर धरणाची तहान भागवली जाते; परंतु यंदा उशिरा का होईना पण परतीच्या पावसाने मोठी आशा निर्माण केली असून पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीलाही रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain In Takali Rajeray Circle