धाराशिव : जिल्ह्यातील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या अनुदानापोटी २२१ कोटी ८१ लाख रुपये निधी वितरणास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. शासकीय नियमाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने आठ ऑक्टोबरला राज्य शासनाला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जिल्ह्यातील बाधित एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रासाठी २२१ कोटी ८१ लाख रुपयांची मागणी केली होती. राज्य शासनाने त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे..जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचा अनुदान मागणी प्रस्ताव उशिराने गेल्याने रखडला होता. त्यातच विधानसभेची आचारसंहिता लागल्याने त्याला बराच उशीर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते..लोहारा, उमरगा तालुक्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना ८६ कोटी ४६ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव १५ ऑक्टोबर रोजी शासनाकडे पाठवलेला आहे. मुख्य सचिवांनी त्याला मान्यता देऊन राज्य मंत्रिमंडळाच्या परवानगीसाठी ठेवला आहे. त्यावर निर्णय होणे बाकी आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटीद्वारे थेट मंत्रालयातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत. जिरायती क्षेत्रासाठी १३ हजार ६०० रुपये प्रती हेक्टरप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित पैसे मिळणार आहेत..तालुकानिहाय मिळू शकणारी मदततालुका शेतकरी संख्या रक्कम (रुपये)धाराशिव ६५ हजार ६३३ ९८ कोटी ४७ लाखकळंब ६५ हजार ३३१ ७३ कोटी ४५ लाखपरंडा १४ हजार ३९५ ९ कोटी ४४ लाखवाशी ३५ हजार ५७ ४० कोटी ३ लाखलोहारा ३७ हजार ०० ४० लाख ५२ हजार.Leopard News : बिबट्या आला रे ऽ आला..! वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ .महसूल विभागाने मंगळवारी शासन निर्णय काढून अतिवृष्टी अनुदानासाठी २२१ कोटी ८१ लाख रुपये मंजूर केले आहेत. लोहारा आणि उमरगा तालुक्याचा प्रस्ताव उशिराने गेल्याने त्यावरही पुढील आठवड्यात निर्णय होईल. या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांना ८६ कोटी ४६ लाख रुपये मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- अनिल जगताप, सामाजिक कार्यकर्ते.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.