
छत्रपती संभाजीनगर : दीर्घ प्रतीक्षेनंतर मराठवाड्यातील जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. सुमारे ३२ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. काही नद्या खळाळल्या. या पावसामुळे खरीप पिकांना आधार आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांत किरकोळ अपवाद वगळता पाऊस झालेला नाही.