
बीड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे ४ लाख ३५९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी राज्य शासनाने जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी ५४४ कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठीचे काम सुरू करण्यात आले आहे.