parli vaijnath rain water
sakal
परळी वैजनाथ - तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आभाळ फाटले असून सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे तीन मंडळात अतिवृष्टी, गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले आहे. या पावसामुळे आलेल्या पुराने परळी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्ग, सेलू-लोणी, भिलेगाव-परळी रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने गावचा संपर्क तुटला आहे. तर लाडझरी येथे जिल्हा परिषद शाळेसह गावातील अनेक घरात ४ फुट पाणी साचल्याने नागरीकांचे हाल झाले.