हिंगोली जिल्ह्यातील दमदार पावसाने कयाधू नदीला पूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली- कयाधू नदीला आला पूर

हिंगोली जिल्ह्यातील दमदार पावसाने कयाधू नदीला पूर

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी (ता. आठ) मध्यरात्री सुरु झालेला दमदार पाऊस बुधवार (ता. नऊ) सकाळी सहावाजेपर्यंत सुरु होता. या पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या कयाधू नदीला पुर आला आहे. हा पाऊस जिल्हाभरात सर्वदुर झाला आहे. मागील चोवीस तासात २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी ७.१९ मिलीमीटर पाऊस झाला. हिंगोली तालुक्यात २०. ९० मिलीमीटर, कळमनुरी १८. ७०, वसमत २६. २०, औंढा नागनाथ ४२. २० तर सेनगाव तालुक्यात ३२. ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण २७ मिलीमीटर पाऊस झाला तर सरासरी ७. १९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा - अनेक भागात मागील आठवड्यात बऱ्यापैकी पावसाची नोंद झाल्याने खरीप पेरणीची लगबग सुरू झाली आहे

दरम्यान, जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला असून रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या दिवशी सोमवारी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला त्यानंतर मंगळवारी (ता. आठ) मृग नक्षत्रास सुरुवात झाली. दिवसभर कडक ऊन पडले होते. रात्री दहा वाजता पावसाची रिमझिम सुरु झाली त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस सकाळी सहावाजेपर्यंत सुरु होता.

या पावसामुळे शहरातुन वाहणाऱ्या कयाधू नदीला पुर आला होता. जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश गावात हा पाऊस झाला आहे. मृग नक्षत्राची सुरुवात पावसाने झाल्याने शेतकरी समाधन मानत आहेत. आणखी चांगले दोन पाणी झाले की, पेरण्या सुरु करण्याची तयारी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहेत.

येथे क्लिक करा - बरेचदा प्रमाणपत्रावर नाव आणि जन्मतारीख चुकल्याने बरेच घोळ होतात.

मृग नक्षत्रात दाळवर्गीय पिकाची पेरणी झाल्यास उत्पन्न चांगले होते असे शेतकरी सांगत आहेत. मुग, उडीद या दाळवर्गीय पिकाचा पेरा देखील वाढत असल्याचे शेतकरी गणेश काळे यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी सहानंतर पावसाने विश्रांती घेतली मात्र काही वेळ ऊन पडले त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: Heavy Rains In Hingoli District Flood Kayadhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top