
अंबड : सध्या उन्हाळा आहे की, पावसाळा हेच कळायला मार्ग नाही.जालना जिल्हयातील अंबड शहरासह परिसरात रविवारी (ता.25) दुपारी चार वाजेच्या नंतर पावसाने शहराबरोबर अनेक गावाला चांगलेच झोडपले आहे. ढगांच्या गडगडाट व विजेच्या लखलखाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर प्रचंड होता. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफा, कापड मार्केट मध्ये अक्षरशः मुख्य रस्त्यावर भले मोठाले पाण्याचे पाट वाहत होते.यामुळे तलावाचे स्वरूप पाहण्यास मिळाले.बसस्थान परिसरातील मुख्य रस्त्यावरील फळविक्रेते, छोटे- मोठे व्यवसायिक यांची चांगलीच दाणादाण उडाली विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.