
धाराशिव : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे रविवारपर्यंत (ता. २५) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांत या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.