
औसा : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी औसा मतदारसंघातील नागरिक सरसावले. नागरिकांच्या मदतीतून २१ लाखांचा निधी जमा झाला. आमदार अभिमन्यू पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी (ता. दोन) मस्साजोगला भेट देत हा निधी देशमुख कुटुंबाकडे सुपूर्द केला.