लोकांना खायचे वांदे, मग बोकड विकून त्याने केली गरजूंना मदत 

सुरेश रोकडे
Friday, 10 April 2020

नेकनूरमध्ये अनेक कुटुंब सध्या अडचणीत आले आहेत. घरी खायचे वांदे असताना दशरथ कोळपकर याने आपले बोकड विकून येथील गरजूंना किराणा सामान देऊन मदत केली.

नेकनूर (जि. बीड) - घरी खायचे वांदे असताना दशरथ कोळपकर याने आपले बोकड विकून येथील गरजूंना किराणा सामान देऊन मदत केली. सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून सरकारतर्फे २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे हातावर पोट असणारे मजूर यांना काम नसल्यामुळे रोजच्या खायचे वांदे झाले आहेत.

नेकनूरमध्ये अनेक कुटुंब सध्या अडचणीत आले आहेत. येथील युवक दशरथ कोळपकर हा स्वतः गरीब असून वडील मजुरी करतात व शेळ्या सांभाळतात. दशरथ हासुद्धा मोलमजुरी करतो; पण आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून त्याने चक्क आपले बोकड तेरा हजार रुपयांना विकून गावातील गरिबांना किराणा समान दिले. यात साखर, चहापत्ती, बिस्कीट, तेल, शेंगदाणे, तांदूळ यांचा समावेश आहे. मदत करण्याची भावना असली, की ती कशीही करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. दशरथ कोळपकर याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help the needy by selling goats