औसा : औसा-लातूर महामार्गालगत कारंजे खडी केंद्रातील खणीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचा जीव होमगार्डच्या शौर्यामुळे आणि औसा पोलिसांच्या तत्परतेमुळे थोडक्यात वाचला. .बुधवारी (ता. २४) च्या रात्री उशिरा ११.२० वाजता घडलेल्या या घटनेत ‘साहेब मला वाचवा... वाचवा...’ अशी आर्त हाक देणाऱ्या तरुणीला धाडसी होमगार्डने औसा1पोलिसांच्या मदतीने तब्बल १५ मिनिटे खोल पाण्यात संघर्ष करून सुरक्षित बाहेर काढले. पोलिस आणि होमगार्डच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे..आर्त हाक पोहोचली पोलिसांपर्यंतमुळची खरोसा येथील २१ वर्षीय तरुणी वडिलांच्या निधनानंतर आईकडे राहत होती. पुढील शिक्षणासाठी तिला लातूरात ठेवण्यात आले होते. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे ती काही दिवसांपासून नैराश्यात होती. याच नैराश्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत औशाजवळील कारंजे खडी केंद्रातील खोल खणीत उडी मारली. पाण्यात पडल्यावर झाडाच्या फांदीजवळ ती अडकली. .त्या क्षणी तिचा आत्महत्येचा विचार बदलला. मृत्यूच्या दाढेतून सुटण्यासाठी तिने हातातील मोबाईलवरून तातडीने ‘११२’ वर फोन करून मदतीची याचना केली. हा तिचा कॉल लातूर पोलिसात गेला. यावेळी तिने 'मी आत्महत्या करत आहे, एका तलावात अडकले आहे, मला वाचवा’, असे सांगताच लातूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने लोकेशन तपासले व औसा पोलिसांना याची माहिती दिली..घटनास्थळी पोलिसांची धावऔसा पोलिसांनी तात्काळ कारंजे खडी केंद्र परिसरात शोधमोहीम सुरू केली. तेवढ्यात खणीतून ‘मला वाचवा’ असा आवाज कानावर आला. फौजदार अतुल डाके, पोलिस कर्मचारी सचिन मंदाडे, होमगार्ड उध्दव दळवे, नामदेव सोमवंशी आणि उमाकांत फावडे यांनी ताबडतोब त्या दिशेने धाव घेतली..जीवावर उदार होऊन उडीरात्री ११.३० च्या सुमारास परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून होमगार्ड उध्दव दळवे यांनी कसल्याही विचाराशिवाय, वर्दीसकट खोल खणीत उडी घेतली. पाण्यात बुडत असलेल्या तरुणीचे केस पकडून त्यांनी तिला कडेला आणले. दरम्यान, अंधार आणि पाण्याच्या खोलीमुळे तब्बल १५ मिनिटे जीवघेणा संघर्ष करावा लागला. अखेर इतर पोलिसांच्या मदतीने ओढणीचा आधार घेऊन तिला सुखरूप वर काढण्यात यश आले..धाडसाला सलामऔसा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि होमगार्डच्या जीवावर उदार धाडसामुळे एका तरुणीचा अमूल्य जीव वाचला. मृत्यूच्या दाढेतून सुटून नवजीवन मिळाल्याने संबंधित तरुणी व तिच्या आईने पोलिस व होमगार्डचे आभार मानले आहेत. दरम्यान या तरुणीची फौजदार अतुल डाके व पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाले यांनी तिचे समुपदेशन करून भविष्यात असे विचार तिच्या मनात येऊ नये यासाठी प्रयत्न केले..Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा.स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या या धाडसाबद्दल होमगार्ड उध्दव दळवे व औसा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांकडून त्यांच्या या कामगिरीला ‘खऱ्या अर्थाने कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण’ म्हणत सलाम केला जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.