अरे बापरे : अंगाचा थरकाप उडवून देणारे दृष्य, काय  ते वाचा...?

file photo
file photo
Updated on

मानवत (जिल्हा परभणी) -  तालुक्यातील खडकवाडी गावाजवळील एका ओढ्यात सोमवारी ( ता.२४ ) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पंधरा ते वीस फुट लांबीचे अजगर आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे.या अजगराने एका हरणाला पकडून गिळंकृत केले.सदर अजगराचा शोध सुरु असून खडकवाडी ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वारंवार माहिती कळवून देखील वनविभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.

मानवत शहरापासुन आठ किलोमीटर अंतरावर ८०० लोकसंख्येचे खडकवाडी हे गाव आहे.शिवारातुन जायकवाडीचा डावा कालवा गेलेला असून या भागात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.सोमवारी ( ता.२४) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिजा दामोदर डुकरे व मदन दामोदर डुकरे हे बंधू खडकवाडी शिवारातील आपल्या गट क्र.२१ मधील शेतात बैल चारत होते.यावेळी शेताजवळील ओढ्यात हरणाचा आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले.यावेळी अंदाजे पंधरा ते वीस फुट लांबीचे अजगराने एका हरणाला वेढा घालून पकडल्याचे दिसले.या नंतर घाबरलेल्या डुकरे बंधूनी ग्रामस्थांना याबाबत फोनवर माहिती दिली.परंतु ग्रामस्थ येण्यापूर्वीच मयत झालेल्या हरणाला पूर्णपणे गिळंकृत करून अजगर दाट झाडीत निघून गेले.

वर्षेभरापूर्वी हाच अजगर एका शेतकऱ्यांला दिसला होता

दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिवसभर ग्रामस्थांनी शोध मोहीम राबवली.यात ओढ्यात व परिसरात त्या अजगराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र अजगराला पकडण्यात यश आले नाही.सदरील ओढ्या शेजारी एक तलाव असून या तलावात अजगराचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.या भागात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून गिळंकृत केलेले हरण आपल्या कळपासह या तलाव पाणी पिण्यासाठी आले असता अजगराने झडप घालून पकडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वर्षेभरापूर्वी हाच अजगर एका शेतकऱ्यांला दिसला होता परंतु आकाराबद्दल निश्चित अंदाज न आल्याने मोठा साप समजून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तालुक्यात सोमवारी अजगराचे फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

ग्रामस्थ झाले भयभीत

या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी असून सततच्या पावसामुळे गवत व पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सध्या मूग तोडणी साठी महिला मजूर आपल्या मुलांसह शेतात जात आहे.या घटनेने या भागातील शेतकरी भयभीत झाले असून दोन दिवसापासून बहुतांश शेतकरी शेताकडे फिरकलेच नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

वनविभागाचे दुर्लक्ष

याबाबत वनविभागाला कळवून देखील कोणतीही मदत मिळाली नसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.यामुळे ग्रामस्थांनी संबंधित अजगराला पकडण्यासाठी मोहीम उघडली आहे.परंतु अजगर मोठ्या आकाराचे असून गावकऱ्यांकडे साधने देखील उपलब्ध नाहीत.यामुळे गावकरी जिवाशी खेळून अजगराला जेरबंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत.वनविभागाने कारवाई करून अजगराला ताब्यात घेणे गरजेचे असून शेतकऱ्यांना व पशुधनाला धोका निर्माण झाला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com