बीड जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्याचे खंडपीठाचे आदेश

बीड जिल्ह्यात वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती
beed
beedbeed
Updated on
Summary

बीड जिल्ह्यात वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती

औरंगाबाद: बीड जिल्ह्यात नरेगामध्ये गैरप्रकार झाल्याच्या प्रकरणात खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही चौकशीत निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती एस. जी. मेहारे यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यात वर्ष २०११ ते २०१९ या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याप्रकरणी राजकुमार देशमुख यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात २१ जानेवारी २०२१ रोजी खंडपीठाने सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. त्यानंतर २५ जूनरोजी जिल्हाधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करून चौकशी समिती नेमल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानंतर खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

beed
औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जिल्हाधिकारी जगताप यांच्या कार्यकाळात चौकशी होईल असे वाटत नाही, म्हणूनच त्यांची मुख्य सचिवांनी तातडीने बदली करावी, असे आदेश दिले. या प्रकरणाच्या अनुषंगाने नवीन जिल्हाधिकाऱ्यांना नवीन सूचना देण्यात येतील असेही खंडपीठाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे गिरीश थिगळे (नाईक) यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The meeting also focused on the Parli bypass, Autism Park proposal, MGNREGA works, while an unexpected power outage and a tree fall marked the event.
Solar Policy
Heavy rainfall disrupted the weekly vegetable market in Ambad, Jalna district, causing large-scale damage to vegetables and a sharp fall in prices.
Insurance Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com