'जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही',खंडपीठाचा राज्य सरकारला प्रश्न

कोरोनाकाळातही अनेक नेते आणि पुढारी कार्यक्रम करत गर्दी जमवत आहेत
high court
high courthigh court
Updated on

औरंगाबाद: शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या लोकोपयोगी प्रकल्पाच्या उद्घाटनावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (aurangabad bench) राज्य सरकारला खडसावले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या शिरसाट यांनी मोठी गर्दी करत कामाचे उद्घाटन केले होते. नंतर त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. यावर खंडपीठाने राजकीय पुढाऱ्यांच्या जाहीर कार्यक्रमांमुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का, असा सवाल राज्य सरकारला खंडपीठाने केला आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही? असाही प्रश्न खंडपीठाने केला आहे. कोरोनाकाळातही अनेक नेते आणि पुढारी कार्यक्रम करत गर्दी जमवत आहेत. तसेच पोलिसही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. याबद्दल औरंगाबादच्या खंडपीठ नेमके काय म्हणाले-

  • मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रम न घेण्याचं आवाहन करूनही कार्यक्रम का होत आहेत?

  • राजकीय पुढाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत नाही का?

  • जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या नेत्यांवर कारवाई का होत नाही.

  • कारवाई होत नाही याचा अर्थ पोलिस आणि राजकारण्यांचं साटंलोटं आहे का?

  • आता आम्हालाच आदेश द्यावे लागतील. कोरोना काळात असे कार्यक्रम घेऊ नये म्हणून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Maratha Quota
Marathi News Esakal
www.esakal.com