Jamir Pathan
sakal
फुलंब्री - येथील नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवडीत सोमवारी (ता. १२) मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. संख्याबळ समान असतानाही ‘ईश्वर चिठ्ठी’चा कौल भाजपच्या बाजूने लागल्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसला. या प्रक्रियेत शिवसेना (यूबीटी) आणि भाजप यांनी प्रत्येकी एक-एक स्वीकृत सदस्य मिळवण्यात यश मिळवले असून, काँग्रेसची संधी हुकली आहे.