

- नितीन चव्हाण
बीड - परदेशात लाखो रुपयांच्या पगाराचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा बळी ठरलेल्या बीड जिल्ह्यातील नांदुरघाट (ता. केज) येथील स्वप्नील काळुंके या तरुणासह महाराष्ट्रातील ३२ तरुणाचे म्यानमारमधील सायबर अड्ड्यांवरून सुरक्षित सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. म्यानमार सरकार आणि भारतीय दूतावासाच्या संयुक्त विद्यमाने विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवून या सर्वांना सुखरूप भारतात आणले जाणार आहे.