केज - मांजरसुबा येथून भरधाव वेगात निघालेल्या एका कंटेनरने सात-आठ वाहनाना धडक देऊन वीस-पंचेवीस जणांना चिरडले. तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मांजरसुंबा-अंबाजोगाई महामार्गावर शुक्रवारी (ता. १६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. वाहन धडकून व अनेकांना चिरडून पसार झालेला कंटेनर लोखंडीसावरगाव जवळ रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला.