
बीड : अहिल्यानगर-परळी रेल्वेमार्गावरील राजुरी ते बीड दरम्यानच्या टप्प्यावर हायस्पीड (जलदगती) रेल्वेची चाचणी बुधवारी (ता. पाच) होणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून, मंगळवारी (ता. चार) सायंकाळी येथील स्थानकावर रेल्वे इंजिन आणि डबे दाखल झाले.