Satyasai Road Flyover
sakal
चाकूर - चाकूर शहरालगत असलेल्या झिरो पॉईंट परिसरात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने महत्त्वाची उपाययोजना करत शहरात थेट येणारा रस्ता बंद केला आहे. बुधवारी (ता. १७) दुपार पासून सर्व प्रकारची वाहतूक सत्यसाई रोडवरील उड्डाणपुलावरून वळविण्यात आली असून या निर्णयामुळे अपघातांची मालिका रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासोबतच लातूररोड येथे रस्त्यासाठी पर्याय शोधण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.